मोदींच्या आफ्रिका दौर्‍याचे महत्त्व

0
143
  • शैलेंद्र देवळाणकर

संपूर्ण जगाचे लक्ष आङ्ग्रिकेकडे लागलेले आहे. आङ्ग्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील मोठ्या देशांत स्पर्धा सुरू आहे. आज चीन हा आङ्ग्रिकेचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असला तरी या देशांना भारताविषयी आदरभाव आहे. अनेक वर्षांपासून भारताचे आङ्ग्रिकेशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. याचा ङ्गायदा भारताने करून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्याचा आफ्रिका दौरा महत्त्वाचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच दिवसांच्या आङ्ग्रिका दौर्‍यावर आहेत. त्यांचा हा दुसरा आङ्ग्रिका दौरा आहे. यापूर्वी त्यांनी सहा देशांना भेटीचा आङ्ग्रिका दौरा केला होता. आताच्या दौर्‍यामध्ये ते रवांडात व युगांडात नुकतेच जाऊन सध्या ते दहाव्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आङ्ग्रिकेला गेले आहेत. दक्षिण आङ्ग्रिका हा ब्रिक्स संघटनेचा सदस्य देश आहे आणि दरवर्षी या संघटनेची परिषद सदस्य असणार्‍या वेगवेगळ्या देशांमध्ये होत असते. यावेळी ती दक्षिण आङ्ग्रिकेमध्ये असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत. मोदी सरकारचा गेल्या सव्वा चार वर्षांचा कार्यकाळ पाहिल्यास हे सरकार एकंदरीतच आङ्ग्रिकेला विशेष महत्त्व देत असल्याचे लक्षात येते. आङ्ग्रिकेमध्ये भारतीय गुंतवणूक जास्तीत जास्त कशा प्रकारे वाढू शकेल आणि भारताच्या आर्थिक विकासाला आङ्ग्रिकेचा कशा प्रकारे हातभार लागू शकेल या दृष्टिकोनातून मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

आङ्ग्रिका खंड हा भौगोलिकदृष्ट्या दुसर्‍या क्रमांकाचा व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा खंड आहे. या खंडाची लोकसंख्या जवळपास १.७ अब्ज एवढी आहे. या खंडात एकूण ५४ देश येतात. गेल्या दोन दशकांमध्ये या सर्व देशांची आर्थिक प्रगती ही गतिमान झालेली आहे. त्यांची अर्थव्यवस्था वार्षिक पाच टक्के दराने विकसित होत आहेत. या देशांचे ‘सकल घरेलू उत्पन्न’ (जीडीपी) २.८ ट्रिलियन डॉलर एवढे आहे.
जसा भारतात आर्थिक उदारीकरणाच एक भाग म्हणून मध्यमवर्ग वाढीला लागलेला आहे, त्याचप्रकारचा मध्यमवर्ग हा आङ्ग्रिकेतही वाढीला लागलेला आहे. भारतात ज्याप्रमाणे तरुणांची संख्या अधिक आहे, तशीच आङ्ग्रिकेमध्येही तरुणांची संख्या ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पेट्रोलियम पदार्थ (खनिज तेल) आणि सोन्यासारखे विविध धातू यांचे ङ्गार मोठे स्रोत आङ्ग्रिकेमध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष तेथेे लागलेले आहे. आङ्ग्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिका, जपान, चीन यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे.

भारताचा विचार करता, आङ्ग्रिकेमध्ये भारताविषयी ङ्गार चांगले वातावरण असून गेल्या काही वर्षांमध्ये तेथील भारतीयांच्या गुंतवणुकी वाढत आहेत. २०१५ मध्ये भारत सरकारतर्ङ्गे इंडिया आङ्ग्रिका ङ्गोरम समिट आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला ४० हून अधिक आङ्ग्रिकी देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिले होते. भारताकडून आङ्ग्रिकेमध्ये कृषी, जलसिंचन, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारतातील खासगी कंपन्या आङ्ग्रिकेमध्ये गुंतवणूक करू लागल्या आहेत.

भारत आणि आङ्ग्रिका यामधील व्यापार हा २००० सालापासून वाढीला लागलेला आहे. आज दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास ७० अब्ज डॉलर्स आहे. त्याचप्रमाणे भारताने आतापर्यंत ३७ अब्ज डॉलर एवढी मोठी गुंतवणूक आङ्ग्रिकेत केली आहे. भारताचे विकासाचे १३७ प्रकल्प हे आङ्ग्रिकेतील ४१ देशांमध्ये सुरू आहेत. साधन संपत्ती विकसाच्या क्षेत्रातही भारताचे आठ अब्ज डॉलर्सचे प्रकल्प आङ्ग्रिकी देशांमध्ये सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौर्‍यामध्ये सर्वप्रथम रवांडा या देशाला भेट दिली. रवांंडाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. रवांडा ‘गेट वे ऑङ्ग ईस्ट आङ्ग्रिका’ म्हणजेच पूर्व आङ्ग्रिकेचे प्रवेशद्वार म्हटले जाते. आङ्ग्रिकन युनियन या आङ्ग्रिकेतील ४४ देशांच्या संघटनेचे अध्यक्षपद रवांडाकडे आहे. गुंतवणुकीस अत्यंत सोयीस्कर देश म्हणून रवांडाचा उल्लेख केला जातो. आजघडीला ३००० भारतीय तेथे आहेत. भारताने स्थापन केलेल्या आणि भारताकडेच नेतृत्त्व असलेल्या आंतरराष्ट्रीय सौरआघाडी (इंटरनॅशनल सोलर अलायन्स) या संघटनेचा रवांडा हा सदस्य देश आहे. त्यामुळे सौरऊर्जेच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा देश राहणार आहे. रवांडामध्ये ऊर्जा, कृषी आणि सिंचन या क्षेत्रात भारताची गुंतवणूक वाढवत आहे, कारण या देशात एक बाजारपेठ या देशात आकाराला येत असून तिथे व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. आङ्ग्रिकन युनियन या संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून संपूर्ण आङ्ग्रिका खंडामध्ये ङ्ग्री ट्रेड झोन म्हणजेच मुक्त व्यापार क्षेत्र तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे झाल्यास भारताला आङ्ग्रिका खंडात ङ्गार मोठी बाजारपेठ मिळेल.

पंतप्रधान मोदींनी युगांडालाही भेट दिली. युगांडाला भेट देणारे ते दुसरे पंतप्रधान आहेत. १९९७ नंतर म्हणजे २१ वर्षांत एकाही भारतीय पंतप्रधानाने युगांडाला भेट दिलेली नव्हती. युगांडा हा देश ईस्ट आङ्ग्रिकन समिट या संघटनेचा सदस्य आहे. युगांडाशी भारताचे संबंध पूर्वीपासून सलोख्याचे आहेत. १९७० च्या देशात तेथे १ लाख भारतीय होते. मात्र तेथे इबी अमिन या हुकुमशहाची राजवट आली आणि त्याने जाणीवपूर्वक भारतीयांना युगांडाबाहेर लोटले. नंतरच्या काळात मात्र तेथील नेतृत्त्वांनी भारतीयांना पुन्हा बोलावले आणि आजघडीला तेथे ३० हजार भारतीय आहेत. युगांडाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता तेथील भारतीयांची संख्या एक टक्काच आहे; पण युगांडाला मिळणार्‍या एकूण करांमध्ये ६५ टक्के वाटा भारतीयांकडून मिळणार्‍या करांचा आहे. भारताचा युगांडामध्ये मिलिटरी ट्रेनिंग कॅम्पही आहे.
रवांडा आणि युगांडा या देशांना भेटी दिल्यानंतर तिसर्‍या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आङ्ग्रिका दौर्‍यावर ब्रिक्स परिषदेसाठी गेले आहेत. यावेळच्या ब्रिक्समध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या परिषदेसाठी यंदा सर्वच्या सर्व आङ्ग्रिकी देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. आङ्ग्रिकेत झालेल्या मुक्त व्यापारक्षेत्राच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिक्स देशांचा या देशांशी व्यापार कसा वाढू शकतो यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मूडीजसारख्या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेप्रमाणे ब्रिक्सच्या पातळीवरही एक आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था असावी अशी संकल्पना भारताकडून मांडण्यात आली असून त्यासंदर्भातही यंदाच्या परिषदेमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक सहकार्य कसे करण्यात येईल याविषयीही या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. यानिमित्ताने रशिया, चीन आणि दक्षिण आङ्ग्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा होणार असल्यामुळे ही परिषदही भारतासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.

पूर्ण आङ्ग्रिका खंडाचा विचार करता, भारत-चीन यांच्यामध्ये यासंदर्भात तीव्र स्पर्धा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या काळात आता आङ्ग्रिकेच्या दौर्‍यावर आहेत, त्याच काळात शी जिनपिंग हेदेखील या चार देशांच्या दौर्‍यावर आहेत.
चीन हा आङ्ग्रिकेचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. आङ्ग्रिकेत सर्वाधिक गुंतवणूक चीनची आहे. आङ्ग्रिकेची मोठी बाजारपेठ चीनला काबीज करायची आहे. त्यामुळे भारताला आङ्ग्रिकेमध्ये आपला पाया विस्तारताना चीनशी स्पर्धा करावी लागणार आहे. पण आङ्ग्रिकी देशांमध्ये भारताविषयी आदरभाव आहे. या देशांचे भारताबरोबरचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहे. याचा ङ्गायदा भारताने घेणे आवश्यक आहे.