मेरशी टोळीयुद्धातील ७ जण फरारी

0
93

मेरशी येथील शनिवारच्या टोळी युद्धातील दोन्ही गटातील मिळून ७ जण फरारी आहेत. दरम्यान, या प्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केलेल्या ८ जणांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने काल दिला.
मेरशी टोळीतील ५ संशयित आरोपी आणि चिंबल टोळीतील २ संशयित आरोपी फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मेरशी, चिंबल भागात पुन्हा गुंडगिरीला सुरुवात झाल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.