मेंदुला विश्रांती आवश्यक ः डॉ. तोळे

0
108

‘माणूस आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ झोपेत घालवितो. झोपेमुळे मेंदुला विश्रांती मिळते व तो चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. एखाद्या प्राण्याला झोपूच दिले नाही, तर तो प्राणी मरू शकतो. झोपेत असताना आपला मेंदु नको असलेले घटक शरीराबाहेर ङ्गेकत असतो व पुन्हा ताजातवाना होत असतो. त्यामुळे मेंदूला पूर्ण विश्रांती मिळणे आवश्यक असते’, असे मत मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑङ्ग ङ्गंडामेंटल रिसर्च संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. शुभा तोळे यांनी व्यक्त केले.

कोसंबी व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यानपुष्प गुंफताना डॉ. तोळे यांनी मानवी मेंदुची रचना, त्याचे कार्य, मेंदुमधील प्रक्रियेमुळे शरीराद्वारे घडणार्‍या क्रियांचे नियमन, मेंदुचा होणारा विकास, मानवी समूहाच्या अतिप्राचीन काळापासून मेंदुचा होत असलेला विकास, उंदीर व घोड्याचा मेंदु कशाप्रकारे कार्य करतो, वैज्ञानिक प्रयोगांमध्ये प्राण्यांचा केला जाणारा वापर, अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंश, जनुकीय किंवा जीन थेरपी इत्यादी मेंदुशी संबंधित अनेक मुद्दे आजार व विषयांवर प्रदीर्घ विवेचन केले. वरद सबनीस यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. तोळे यांची ओळख करून दिली.
एका जीवामुळे आणखीन जीव जन्माला येतात. त्यामुळे जीवन वाढत जाते, जीव वाढत जातात व जीवन पुढे जात राहते. जीवन चालत राहणे हा त्यामागचा निसर्गाचा हेतू असतो असे डॉ. तोळे म्हणाल्या.
मेंदुची रचना एक चमत्कार
मेंदुची रचना, त्याची जडण-घडण व त्यामध्ये प्राण्याच्या वा मनुष्याच्या वाढीबरोबर होत जाणारे बदल याविषयी घडणारी प्रक्रिया अतिशय किचकट स्वरुपाची असते आणि गर्भातच त्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे मेंदुची रचना व आतल्या भागामध्ये लाखो व कोट्यवधी वाहिन्यांची प्रक्रिया हा अतिशय किचकट व गोंधळाचा आहे. हा निसर्गातील एक मोठा चमत्कार असल्याचे डॉ. तोळे म्हणाल्या.
प्राण्यांवर प्रयोग नाईलाज म्हणून
प्राण्यांचा व उंदरांचा वापर संशोधनात व प्रयोग करण्यात येणार्‍या वापराविषयी प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर प्राण्यांच्या वापराविषयीच्या नैतिकतेच्या मुद्याबद्दल बोलताना डॉ. तोळे म्हणाल्या की, संशोधकांना प्रयोग करण्यासाठी प्राण्यांचा वापर नाईलाज म्हणून करावा लागतो. कारण प्रामुख्याने माकडांचा वा इतर प्राण्यांचा वापर करायचा असेल, तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. जी प्रक्रिया ङ्गारच त्रासदायक असते व प्राण्यांना वेदना व इजा होणार नाही याची खात्री परवानगी देणार्‍या समितीला द्यावी लागते. त्यामुळे संशोधकांना प्राण्यांवर प्रयोग करताना मजा येते, हा निव्वळ गैरसमज आहे व तसे काहीही नसते. प्राण्यांवर व उंदरांवर प्रयोग करताना ङ्गारच काळजी घेतली जाते. प्रयोग करण्यासाठी माणसे कधीही स्वयंसेवक म्हणून तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी जागरण करणे वाईट
आपल्या मेंदुला योग्य विश्रांती मिळाली तर तो चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. त्यामुळे आजचा युवा वर्ग झोपत नाई किंवा जागरण करतो, तसेच रात्रभर जागून अभ्यास करण्याविषयी प्राधान्य दिले जाते. पण त्यामुळे मेंदु चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे पुरेशी झोप घेणे हे आवश्यक असल्याचे डॉ. तोळे यांनी सांगितले.