मृतदेह गायबप्रकरणी दोघांची दोन तास चौकशी

0
75

पणजी (प्रतिनिधी)
गुन्हा अन्वेषण विभागाने बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारातून गायब झालेल्या जानूझ गोन्साविस (२४ वर्षे) या युवकाच्या मृतदेह प्रकरणी फोरेन्सिक विभागाचे निलंबित प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीस व इतर दोघांची काल दोन तास चौकशी केली.
या प्रकरणी फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीस, तांत्रिक साहाय्यक मच्छिंद्रनाथ जल्मी, साहाय्यक प्रकाश नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सदर प्रकरण आगशी पोलिसांकडून गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केले आहे. या प्रकरणाला २० दिवस उलटले तरी प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण विभागाला अद्याप यश प्राप्त झालेले नाही.