मुरगाव राजाचा मंडप हटविला

0
111

सुमारे ३०० हून अधिक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकारी, संयुक्त मामलेदार विमोद दलाल, मुरगाव तालुका पोलिस उपअधिक्षक सुनिता सावंत यांच्या देखरेखीखाली हेडलॅण्ड सडा येथील मुख्य नक्यावरील वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या मुरगावच्या राजाच्या शेडखालील सजावट अखेर हटविण्यात आली. या शेडीवरून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक विरुध्द त्यांचे विरोधक यांच्यामध्ये जुंपली होती.

मुरगावच्या राजा गणेशोत्सव शेडखालील मंडप तसेच केलेली सजावट हटवण्याच्या आदेशावरून वाद निर्माण झाला होता. गणेशोत्सव काळात या शेडखाली तिन्ही बाजूंनी मंडप सजावट करण्यात आली होती. दरम्यान, या मंडपात अनेक गैरप्रकार होत असल्याचा आरोप करून हा मंडप व गणेशोत्सवासाठी केलेली थर्मकॉलची सजावट हटवून शेड खुली करावी, अशी मागणी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक पालिका आणि प्रशासनाकडे केली होती. या कारवाई दरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षिण गोव्यातील मडगाव, वेर्णा तसेच वास्को येथील मिळून सुमारे ३००हून अधिक पोलीस फौज सडा येथील मुख्य नाक्यावर सकाळी ८ वाजल्यापासून तैनात होती.