मुरगाव बीडीओ कार्यालयातील कागदपत्रांची एसीबीकडून तपासणी

0
80

भ्रष्टाचार विरोधी विभागाचे उपअधीक्षक बॉसुएट डी सिल्वा यांनी काल संध्याकाळी मुरगाव गटविकास कार्यालयावर धाड घालून तेथील अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली. निलंबित गट विकास अधिकारी मोहिनी हळर्णकर यांचे लाचखोरी प्रकरण उघड झाल्याने अधिक चौकशीसाठी भ्रष्टाचार विरोधी पथक बीडीओ कार्यालयात दाखल झाले. कार्यालयातील काही कर्मचारी वेळेपूर्वीच घरी गेल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे डिसिल्वा यांनी सांगितले. बीडीओचे सहाय्यक अभियंता कार्यालयात गैरहजर असल्याचे यावेळी पथकाला आढळून आले. तसेच श्री. सिल्वा यांनी अबकारी खात्याच्या कार्यालयालाही भेट दिली असता तेथील निरीक्षक श्री. परेरा कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याने त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.