मुख्यमंत्र्यांविरुद्ध कॉंग्रेसची सीआयडी पोलिसात तक्रार

0
206

>> ईमेल अकाऊंट गैरवापराचा संशय

मुख्यमंत्र्यांच्या ईमेल अकाऊंटचा वापर अन्य व्यक्तींकडून केला जात असल्याचा संशय कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केला असून यासंबंधी एक तक्रार कॉंग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी गुन्हा अन्वेषण विभागाकडे काल दाखल केली आहे.
या ईमेलच्या आधारे सरकारी फाईल्स हातावेगळ्या करण्यात येत असल्याने गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारी फाईल्स ईमेलच्या साहाय्याने हाताळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हाताळलेल्या फाईल्स प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती यांच्याकडे येतात. यासंबंधीचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. सरकारचा प्रशासकीय कारभार दिवसेंदिवस ईमेल आणि फोनच्या संभाषणातून हाताळला जातो. मुख्यमंत्र्याचा ईमेल, फेसबुक आणि ट्वीटर अकाऊंट वर्ष २०१२ पासून कोअर टीमकडून हाताळला जात आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.