मुख्यमंत्र्यांचे साखळीत मतदान

0
174

गोव्याचे मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ.प्रमोद सावंत यांनी आपल्या पत्नी सौ.सुलक्षणा सावंत यांच्या सह कोठंबी(पाळी) येथील बुथ नं.४७ सरकारी प्राथमिक विद्यालय या ठिकाणी मतदान केले. लोकसभेप्रमाणे यंदाही मतदारांमध्ये उत्साह दिसत असून मतदारांनी सकारात्मक मतदान केले आहे. राष्ट्रवादासाठी, देशाच्या सुरक्षा व भविष्यासाठी मतदान केले आहे. गोव्यातील जागा दोन्हीही जागा उत्तरेत श्रीपाद नाईक पाचव्यांदा व दक्षिणेत नरेंद्र सावईकर दुसर्‍यांदा निवडून येतील व नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी हात बळकट करतील अशी प्रतिक्रिया मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.