मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली १३८ अर्जांना मिळाली मान्यता

0
181

>> २०० जणांना मिळणार रोजगार ः तानावडे

१९ च्या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली १३८ अर्जांना मान्यता दिली असून या अर्जदारांना ८.९० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असून २०० जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

मंडळाच्या टास्क फोर्स समितीची मागील दोन महिन्यात बैठक झाली नव्हती. स्वयंरोजगार योजनेमध्ये मान्यता देण्यात आलेल्या १३८ अर्जात ३१ महिलांचा समावेश आहे. मंडळाने मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेखाली आत्तापर्यंत २०३.५७ कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे. त्यातील १७४.२२ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आला आहे. या योजनेमुळे सुमारे १० हजार जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. मंडळाने १०८.०६ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली केली असून वसुलीची टक्केवारी ९३.९८ टक्के एवढी आहे. मंडळाला आत्तापर्यंत १८.१९ कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील पहिला मेळावा येत्या १८ नोव्हेंबर रोजी साखळी येथील रवींद्र भवनात घेण्यात येणार आहे. डिचोली, मये, साखळी, पर्ये आणि वाळपई या पाच विधानसभा मतदारसंघासाठी हा मेळावा खुला आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले. या योजनेतील दुसरा मेळावा ५ डिसेंबर २०१९ रोजी कुडचडे येथील रवींद्र भवनात घेण्यात येणार आहे. सांगे, केपे, सावर्डे, कुडचडे आणि शिरोडा मतदारसंघासाठी हा मेळावा मर्यादित आहे, असेही तानावडे म्हणाले.