मुख्यमंत्री पर्रीकर यांचे खातेप्रमुखांना आदेश

0
150

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांची बैठक काल घेतली. सरकारी कामकाजात सुसूत्रता आणण्यावर भर देण्याची सूचना खाते प्रमुखांना त्यांनी केली. नागरिकांची कामे वेळेवर हातावेगळी करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. वेळेवर सेवा न देणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. खात्यांनी नवीन वाहनांची खरेदी न करण्याचे आदेश त्यांनी दिले.