मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थिर

0
160

>> शुक्रवारी लिलावतीत अपॉईंटमेंट

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अतिसार व डिहायड्रेशनसाठी उपचार घेणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे काल गोमेकॉतील सूत्रांनी सांगितले. गोमेकॉतील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.

पर्रीकर यांनी सध्या पूर्णपणे विश्रांती घ्यावी व सरकारी कामकाज हाताळू नये व आजारी असताना त्यांनी सरकारी फाईल्स हातावेगळ्या करण्याच्या प्रयत्नात मानसिक ताण घेऊ नये, अशी सूचना त्यांना डॉक्टरांनी केलेली असतानाच पर्रीकर हे सध्या इस्पितळातूनच तातडीच्या फाईल्स हातावेगळ्या करत आहेत.
दरम्यान, पर्रीकर यांना शुक्रवारी लिलावती इस्पितळात उपचारासाठी अपॉइन्टमेंट आहे. त्यामुळे त्यांना गोमेकॉतून उद्या संध्याकाळी अथवा शुक्रवारी गोमेकॉतून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईकडे प्रयाण करणार असल्याचे वृत्त आहे.

डिसोझांकडे ताबा देणार?
दरम्यान, पर्रीकर हे आजारी असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा ताबा मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे देण्यासंबंधी हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.