मुख्यमंत्री गोव्यात परतले

0
136

विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या कुटुंबासह विश्रांतीसाठी म्हणून दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर काल गोव्यात परतले.

आपल्या या दिल्ली भेटीत त्यांनी कुटुंबीयांसमवेत राष्ट्रपती भवनालाही सदिच्छा भेट दिली. मुख्यमंत्री म्हणून कार्यालयात जावेच लागते. ङ्गायलींचा प्रचंड ढीग टेबलावर पडलेला असून पुढील दोन दिवसांत त्या सर्व ङ्गायली हातावेगळ्या करणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागू आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच ती संपेल. त्यामुळे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे शक्य होत नाही, परंतु नियमित स्वरूपाची दैनंदिन कामे करावीच लागतात, असे ते म्हणाले. खर्‍या अर्थाने आपल्याला अद्याप विश्रांती अशी मिळालेलीच नाही, असेही त्यांनी सांगितले. पार्सेकर निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या पक्षाला किमान २२ ते २३ जागा मिळतील असा त्यांना विश्‍वास आहे. त्यांचे प्रतीस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे या निवडणुकीत पार्सेकर यांचा पराभव होईल, असा दावा करीत आहेत.