मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही

0
71

दिल्ली भाजपाध्यक्षांची स्पष्टोक्ती
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याची माहिती दिल्ली भाजपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी दिली. भाजप ही निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली लढणार असल्याचे उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमतासह निवडून येऊन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी भाजपकडे प्रबळ नेता नाही असे कोणी समजू नये असेही ते म्हणाले. भाजपच्या वरील निर्णयाच्या समर्थनार्थ उपाध्याय यांनी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. याआधीच्या निवडणुकीआधी भाजपने आपले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून हर्ष वर्धन यांच्या नावाची घोषणा केली होती. त्या निर्णयानंतर भाजपात बर्‍याच कुरबुरी सुरू झाल्या होत्या. मात्र यावेळी तसे न करता योग्य वेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले. भाजपात या संदर्भात लोकशाही प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडून येणारे आमदारच मुख्यमंत्री ठरवतील. असे त्याबाबत कोणताही मुद्दा नाही असे त्यांनी सांगितले.