मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबारात ८ जण ठार

0
106

अमेरिकेतील मिसिसिपी येथे एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान ८ नागरिक ठार झाले. संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सकाळी घडली.
सदर माथेफिरूने लिंकन काऊंटी येथील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यामागे त्याचा कोणता हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर पीडित व्यक्तींना ओळखत होता की नाही याबाबत अजून माहिती उपलब्ध झालेली नाही. गेल्या सोमवारी ब्रिटनमधील मँचेस्टर येथे आरियाना ग्रँडे या पॉप गायिकेच्या कार्यक्रमावेळी आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २२ लोक ठार झाले होते.