माशांतील फार्मेलिन विषयीचा अहवाल ऑगस्टमध्ये अधिसूचित

0
123

>> उच्च न्यायालयात एङ्गएसएसएआयची माहिती

माशांमध्ये नैसर्गिकरीत्या होणार्‍या ङ्गॉर्मल्डिहाइड विषयीचा अहवाल ऑगस्ट २०२० पर्यंत अधिसूचित केला जाईल, अशी माहिती एङ्गएसएसएएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अगरवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली.
येथील उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ङ्गार्मलिन-इन-ङ्गिश मुद्यांवर दाखल झालेल्या पाच जनहित याचिकेसंदर्भात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे (एङ्गएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पवन अगरवाल यांनी उच्च न्यायालयात सोमवारी हजेरी लावली. मुख्य कार्यकारी अधिकार्‍याला ५ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला होता. तथापि, काही कारणास्तव त्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत.

राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मडगाव येथील घाऊक मासळी मार्केटमध्ये परराज्यातून आणण्यात आलेल्या मासळीच्या केलेल्या तपासणीमध्ये मासळीमध्ये घातक फॉर्मेलीनचा समावेश असल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी न्यायालयाला सांगितले की विविध प्रकारच्या माशांमध्ये नैसर्गिकरीत्या होणार्‍या ङ्गॉर्मल्डिहाइडच्या प्रमाणात एङ्गएसएसएआयचा अहवाल जुलै २०२० मध्ये तयार करून ऑगस्ट २०२० पर्यंत अधिसूचित केला जाईल. उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एङ्गएसएसएएआयला माशांच्या विविध प्रजातीमधील ङ्गॉर्मल्डिहाइडच्या मर्यादेचे निकष निर्दिष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.