मायकल लोबोंवरील हल्ला; आरोपीचे ‘लोकेशन’ नाही

0
97

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करून बेपत्ता झालेला केल्फी गोव्याबाहेर निसटून गेल्याचा तर्क हणजूण पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला आहे, त्यामुळे त्याचे ‘लोकेशन’ (ठावठिकाणा) काढणे कठीण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध चालू असल्याचे हणजुण पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले. दरम्यान, त्याला अजून अटक होत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.