मानव ठक्कर उपविजेता

0
102

भारतीय टेबलटेनिसपटू मानव ठक्कर याला ‘२०१८ आयटीटीएफ वर्ल्ड ज्युनियर सर्किट’च्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. लक्झमबर्ग येथे सदर स्पर्धा झाली.

सहाव्या व अंतिम गेममध्ये मानवला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. स्पर्धेसाठी तृतीय मानांकन लाभलेल्या मानवला अमेरिकेच्या कनक झा याच्याकडून ३-४ (११-९, ३-११, ११-९, ६-११, ३-११, ११-९, ६-११) अशी हार पत्करावी लागली.

अमेरिकेचा कनक मुख्य स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला नव्हता. परंतु, साखळी फेरीतील कामगिरीच्या बळावर त्याने मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. मानवने केलेल्या चुकांचा योग्यवेळी लाभ उठवत कनक याने विजयाला गवसणी घातली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मानवने इजिप्तच्या युसूफ अब्दुल अजीझ याला ११-८, ११-८, ११-५, ११-८ असे हरवून अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.
अजीझ याने साखळी फेरीत कनकला नमविले होते. दुसर्‍या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कनकने सहाव्या मानांकित रशियाच्या इव्होनिन डेनिस याला ११-३, १२-१०, ११-९, ११-६ असे पराजित करत जेतेपदाच्या लढतीत स्थान निश्‍चित केले होते.