माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

0
137

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचेही उपचार सुरूच होते. आता त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली आहे.

काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रणव मुखर्जींना दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी, प्रणव मुखर्जी यांनी कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन राहण्याचे तसेच कोरोना चाचणी करण्याची विनंती ट्विटद्वारे केली होती.