महिला चालक असलेल्या पर्यटक टॅक्सी धावणार

0
83

मुंबईच्या धर्तीवर गोव्यात प्रथमच प्रयोग
उद्या शुभारंभ
पहिले १० परवाने प्रदान
पर्यटन खात्याचा उपक्रम
गोवा पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील महिला चालक असलेल्या टॅक्सी सुरू करण्याची योजना तयार केली असून उद्या गुरुवार दि. १६ रोजी संध्याकाळी ६ वा. महामंडळाच्या मिरामार येथील यात्रीनिवासात आयोजित केलेल्या एका शानदार सोहळ्यात या योजनेचा शुभारंभ होईल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखील देसाई यांनी दिली. पहिल्या टप्प्यात दहा महिलांना टॅक्सी चालक म्हणून परवाने देण्यात आले असून भविष्य काळात महिलांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ होऊ शकेल. मुंबईत महिला टॅक्सीचालक आहेत. गोव्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.