महिला कॉंग्रेसतर्फे ‘मेगा ब्लॉक’ निषेधार्थ आज मोर्चा

0
107

पणजी – मडगाव महामार्गावर आगशी – कुठ्ठाळी येथे गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या प्रचंड वाहतूक कोंडीचा निषेध करण्यासाठी महिला कॉंग्रेस पक्षातर्फे आज गुरुवारी सकाळी ९ वा. एका निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काल दिली.
हा मोर्चा कुठ्ठाळी जंक्शन येथून सुरू होणार असून आगशी पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा जाणार असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.