महाराष्ट्र, प. बंगालच्या चित्ररथांचे प्रस्ताव केंद्राने नाकारल्याने वादंग

0
129

>> सीएएच्या विरोधामुळे डावलल्याचे आरोप

येथे होणार्‍या यंदाच्या प्रजासत्तात दिन सोहळ्यातील चित्ररथ संचलनात महाराष्ट्र व प. बंगाल या राज्यांचे चित्ररथ दिसणार नाहीत. त्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या राज्यांचे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. या दोन्ही राज्यांनी सीएए कायद्याला विरोध दर्शविल्याने त्यांचे प्रस्ताव नामंजूर केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मात्र आतापर्यंत सहा वेळा या संचलनात प्रथम पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्राचा प्रस्ताव यावेळी नामंजूर करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राने मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या संकल्पनेवर चिरत्रथ सादरीकरणाचा प्रस्ताव दिला होता.

दरम्यान प. बंगालच्या चित्ररथ प्रस्तावालाही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मंजुरी नाकारली आहे. प. बंगालमधील कन्याश्री या योजनेवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या राज्याचा दुसर्‍यांदा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सीएए कायद्याची राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले असल्याने यंदा बंगालचा प्रस्ताव नाकारल्याचा दावा सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

शिवसेनेकडून संताप
महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याबद्दल शिवसेना नेते खासदार संजय राऊत तीव्र संताप व्यक्त केला आहे.