महाराष्ट्रात भाजप-मनसे युती?

0
124

>> आशिष शेलार-राज ठाकरे यांच्यात चर्चा

शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. त्यातच काल रविवारी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सुमारे एक तास कृष्णकुंजवर चर्चा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आमदार शेलार यांनी भेट घेत तासभर चर्चा केली.त्यामुळे भाजप-मनसे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकाबाजूला तर, भाजपा-मनसे एकाबाजूला असे चित्र आहे. भाजपा आणि मनसेमध्ये अधिकृत आघाडी नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय जवळीक मात्र वाढत चालली आहे. राज ठाकरे यांनी धरलेली हिंदुत्वाची कास आणि मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा यातून राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपाच्या मैत्रीकडे झुकत असल्याच्या चर्चा आहेत. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकीय मोट बांधण्यासाठी आणि शिवसेनेला मुंबईत धक्का देण्यासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता आहे.