महानंद नाईकच्या जन्मठेपेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

0
112

सिरीयल किलर महानंद नाईक (तरवळे – शिरोडा) याला वासंती गावडे या युवतीच्या खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

१९९५ ते २००९ या काळातील उघडकीस आलेल्या सोळा युवतींच्या खुनांच्या प्रकरणामुळे गोवा हादरला होता. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सिरीयल किलर महानंद नाईक याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. महानंद नाईक याला आत्तापर्यंत तीन युवतींच्या खून प्रकरणांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर चार प्रकरणांमध्ये निर्दोष सुटका झाली आहे. सध्या मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने जिल्हा न्यायालयाचा निवाडा उचलून धरला आहे. खंडपीठाने महानंद नाईक याची निवाड्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.