महात्मा गांधींचे स्थान ‘भारत रत्न’पेक्षाही श्रेष्ठ

0
127

>> सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार देण्यात यावा यासाठी मागणी करणारी एक जनहीत याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्या. बी. आर. गवई व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर यावरील सुनावणी झाली. ‘महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत आणि नागरिकांच्या हृदयात त्यांचे स्थान उच्च असे आहे. त्यासाठी त्यांना औपचारिक पुरस्कार देण्याची गरज नाही.’ अशी टिप्पणी खंडपीठाने केली. मात्र याचिकादार अनिल दत्त शर्मा यांच्या या संदर्भातील भावनांशी खंडपीठाने सहमती दर्शवली. तसेच या अनुषंगाने याचिकादाराने केंद्र सरकारकडे प्रतिनिधीत्व करण्यास न्यायालयाने मान्यता दिली.