मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो

0
145

उस्मानाबाद येथे होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ङ्गादर ङ्ग्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत उस्मानाबाद येथे काल रविवारी भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. हे साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे.

या बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ अशा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदने साहित्यिक ङ्गादर ङ्ग्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुचवले होते. या नावावर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे त्यांनी नाव सूचवले नाही. इतर संस्थांनी सूचवलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांची निवड करण्यात आली.

दिब्रिटो यांचे ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओऍसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.