मयेच्या जमिनीच्या ‘एक-चौदा’वर मालक म्हणून आता सरकारचे नाव

0
96

यंदाच्या गोवा मुक्तिदिनापूर्वी मयेवासीयांचा प्रश्न सुटण्याची आशा जागली असून मये गावच्या जमिनीच्या एक चौदाच्या उतार्‍यावर आता मालक म्हणून सरकारचे नाव लागणार आहे. सरकारने गावची जमीन गावकर्‍यांच्या नावे हस्तांतरीत करण्याची प्रक्रियाही सुरू केली असून येत्या दोन महिन्यांत त्यासंबंधी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होऊ शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली. भूहस्तांतरणाच्या कामाला गती देण्यासाठी दोन विशेष अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.मयेवासीयांच्या जमिनीचा प्रश्न गेली अनेक वर्षे सतत गाजत राहिला असून मये भूविमोचन समितीच्या माध्यमातून नागरिकांनी सातत्याने आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवला होता. त्यानंतर विद्यमान सरकारने खास विधेयक संमत केले होते. त्याला मध्यंतरी गोव्यात हंगामी राज्यपाल म्हणून आलेल्या ओमप्रकाश कोहलींनी आपली मान्यता दिली होती.
ही जमीन मुंडकारांना हस्तांतरित करण्यात यावी असे सदर कायद्यात म्हटले आहे. त्यामुळे त्यानुसार सरकारची मालकी झाली की ही जमीन मुंडकारांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार आहे.