मनोहर पर्रीकर व विश्वजित राणे विजयी

0
111

पणजी आणि वाळपई मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पणजीतून मनोहर पर्रीकर व वाळपईतून विश्वजित राणे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
मनोहर पर्रीकर यांना 9862 मते ((63.47 टक्के) मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना 5059 (32.56 टक्के) मते प्राप्त झाली. गोवा सुरक्षा मंचाचे आनंद शिरोडकर यांना 220 मते (1.42 टक्के) मिळाली, तर केनेथ सिल्वेरा (अपक्ष) यांना 96 मते मिळाली. 301 मतदारांनी नोटा विकल्प निवडला.
वाळपईत विश्वजित राणे यांना 16188 (70.19 टक्के) मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राॅय नाईक यांना 6101 (26.45 टक्के) मते मिळाली. रोहिदास गावकर (अपक्ष) यांना 316 मते मिळाली तर 458 मतदारांनी नोटा पर्याय निवडला.