मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

0
120

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे काल सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. टंडन यांच्यावर लखनौच्या गुलाला घाट येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. लालजी टंडन यांना गेल्या आठवड्यात लखनौच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती, असे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.