मडकईकरांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

0
76

>> बेहिशेबी मालमत्ता

वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ऍड. आयरिश रॉड्रीग्स यांनी गोवा लोकायुक्तांकडे काल तक्रार दाखल केली.
ऍड. रॉड्रीग्स यांनी वीज मंत्री मडकईकर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची संबंधितांनी दखल न घेतल्याने ऍड. रॉड्रीग्स यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे.
ओल्ड गोवा येथे वीज मंत्री मडकईकर यांनी अंदाजे २०० कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. या विरोधात ऍड. रॉड्रीग्स यांनी राज्यपाल. पुरातत्त्व खाते व इतरांकडे तक्रार केली आहे. पुरातन वास्तूच्याजवळ बेकायदा बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर ९ मे २०१८ रोजी एसीबीकडे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.