मडकईकरांची प्रकृती स्थिर

0
69

मुंबईला गेले असताना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मुंबईतील कोकिळाबेन इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आलेले गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती आता स्थिर असून अजूनही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, असे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

सोमवारी मध्यरात्री मडकईकर यांना मुंबईतील एका हॉटेलात वास्तव्यास असताना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर कोकिळाबेन इस्पितळात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ७२ तास त्यांना अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून शस्त्रक्रिया करून २४ तास उलटले आहेत.
दरम्यान, मंत्री सुदिन ढवळीकर, गोविंद गावडे, खासदार विनय तेंडुलकर व भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पांडुरंग मडकईकर यांची काल कोकिळाबेन इस्पितळात जाऊन विचारपूस केली.