मच्छीमारी जेटींवर ‘माफिया राज’

0
110

>> चौकशी व कारवाईचे मंत्र्यांचे आश्‍वासन

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी मालिम जेटीवर माङ्गिया राज आणि गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप काल विधानसभेत केली. मालिम जेटीवर गोमंतकीय मच्छीमारांवर अन्याय केला जात असून याप्रकरणी चौकशीची मागणी आमदारांनी केली. या प्रकरणी पोलिसांच्या सहकार्याने सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन मच्छीमारी मंत्री ङ्गिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी प्रश्‍नाला उत्तर देताना दिले.

नीळकंठ हर्ळणकर यांनी यासंबंधीचा मूळ प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री रॉड्रीगीस यांनी सांगितले की, स्थानिक नागरिक मच्छीमारी ट्रॉलर्स आपल्या नावावर घेतात आणि दुसर्‍याला चालविण्यासाठी देतात. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तसेच, वाढत्या ट्रॉलर्समुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. मच्छीमारी जेटीवरील गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली जाणार असून योग्य कारवाई केली जाणार आहे. राज्यातील मच्छीमारी जेटीवर बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. मालिम जेटीवर अतिक्रमण करण्यात आल्याची कबुली रॉड्रीगीस यांनी दिली. मासळी व्यावसायिकांच्या कोल्ड स्टोरेजच्या गैरकारभाराची चौकशी केली जाणार आहे, असेही रॉड्रीगीस यांनी सांगितले.

मालिम जेटीवर अनेक बेकायदा गोष्टी घडत आहेत. काही जणांनी अतिक्रमण केले आहे. सरकारकडून या जेटीच्या विस्तारावर लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत. या लाखो रुपयांचा लाभ स्थानिक मच्छीमारांना मिळणार नाही. कारण मालिम जेटीवर माङ्गियाचे राज सुरू आहे. मालिम जेटीवरील गैरव्यवहाराची दक्षता खात्यामार्ङ्गत चौकशी करण्याची गरज आहे, असे हर्ळणकर यांनी सांगितले.

मालिम जेटीवर स्थानिक मच्छीमारांवर अन्याय केला जात आहे. या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ६ गोमंतकीय मच्छीमारांना सोसायटीमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. सोसायटीवर परप्रांतियांचे वर्चस्व निर्माण झाले आहे, असे ग्लेन टिकलो यांनी सांगितले. मालिम येथे ४ गोमंतकीय मच्छीमारांना डिझेल दिले जात नाही. मालिम जेटी सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली. मालिम जेटीवरील गैरकारभार आणि प्रश्‍न जाणून घेण्यासाठी मंत्र्यांनी जेटीला प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी आमदार रोहन खंवटे यांनी केली. सर्वच मच्छीमारी जेटी समस्यांच्या विळख्यात सापडल्या असून स्थानिक मच्छीमारांना योग्य न्याय मिळत नाही, असे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.

हजारो कामगारांची
नोंद करण्याची मागणी
आगामी मच्छीमारी मोसमाला सुरुवात होणार असल्याने सुमारे १० हजार बिगर गोंमतकीय कामगार येणार आहेत. मच्छीमारी ट्रॉलर्सवर स्थानिक नागरिक काम करीत नाही. त्यामुळे ट्रॉलर्स मालकांना परराज्यातील कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारी यंत्रणेने परराज्यातून येणार्‍या कामगारांची सविस्तर माहिती नोंद करून घ्यावी, असे ङ्ग्रान्सिस सिल्वेरा यांनी सांगितले.