मच्छिमारी बंदी अंमलबजावणीसाठी खात्याकडे साधनसुविधांचा अभाव

0
152

>> मच्छिमारीमंत्री पालयेकरांची माहिती

राज्यात एकूण ६१ दिवस मच्छिमारी बंदी असेल व ही बंदी १ जूनपासून लागू होणार आहे, अशी माहिती मच्छिमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यानी काल दिली. मात्र, बंदीकाळाच्या अंमलबजावणीसाठी खात्याकडे साधनसुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ह्या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच बंदीचे उल्लंघन होऊ नये तसेच बेकायदेशीरपणे बंदीच्या काळात मच्छिमारी केली जाऊ नये यासाठी लक्ष ठेवण्याची गरज असली तरी तसे लक्ष ठेवण्यासाठी खात्याकडे आवश्यक तेवढे मनुष्यबळ नसल्याचे पालयेकर यानी काल सांगितले.

गस्तीनौकाही नाहीत
बंदीच्या काळात मच्छिमारी होऊ नये यासाठी मनुष्यबळाबरोबरच गस्ती नौकांचीही गरज आहे. पण गस्ती नौकाही खात्याकडे नसल्याचे पालयेंकर यानी स्पष्ट केले.
१ जूनपासून राज्यातील खोल समुद्रात यांत्रिकी बोटींद्वारे केली जाणारी मच्छिमारी बंद करण्यात येणार असून ही बंदी एकूण ६१ दिवस लागू राहणार असल्याचे पालयेंकर यानी सांगितले.