मगो पक्षातर्फे युतीचा अद्याप निर्णय नाही : दीपक ढवळीकर

0
100

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करायची की नाही याचा मगो पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. येत्या डिसेंबर महिन्यात पक्षाची नवी केंद्रीय समिती निवडण्यात येणार आहे. त्यानंतरच युतीसंबंधी काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

भाजपबरोबर येत्या लोकसभा निवडणुकीत युती करायची की नाही याचा निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही पक्षाच्या नव्या केंद्रीय समितीकडे सोपवणार असल्याचे ढवळीकर पुढे म्हणाले. सध्या आमचा सगळा भर हा पक्ष उभारणीवर आहे. राज्यातील १३ मतदारसंघांत मगो पक्ष बळकट आहे. ह्या मतदारसंघांत लवकरच समित्या स्थापन करणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी यावेळी दिली.