मंदारराव देसाईची शिबिरासाठी निवड

0
121

आयएसएलमधील फ्रेंचायझी एफसी गोवाचा कर्णधार मंदारराव देसाई याचा इंटरकॉंटिनेंटल कप स्पर्धापूर्व शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या ३५ भारतीय खेळाडूंमध्ये समावेश आहे. मंदारच्या समावेशामुळे भारतीय संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. २५ जूनपासून हे शिबिर होणार आहे. निवृत्ती मागे घेतलेला बचावपटू अनास इदाथोडिका याचे ंसंघात पुनरागमन झाले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या एफएफसी आशिया चषक स्पर्धेत भारताचे आव्हान गट फेरीतच आटोपल्यानंतर अनासने निवृत्ती जाहीर केली होती. अनासने भारतासाठी १८ सामने खेळले आहेत. बचावफळीतील नारायण दास याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मध्यफळीत निखिल पुजारी, मंदारराव देसाई व आशिक कुरुनियान यांना संघात घेताना बिक्रमजीत सिंग, धनपाल गणेश, जर्मनप्रीत सिंग, रिडिम त्लांग, नंदा कुमार व कोमल थाटल यांना डच्चू देण्यात आला आहे. आघाडीपटूंमध्ये सुमीत पस्सीला स्थान मिळालेले नाही.

भारतीय संघ ः गोलरक्षक ः गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदर सिंग, कमलजीत सिंग, बचावपटू ः राहुल भेके, प्रीतम कोटल, निशू कुमार, अनास इदाथोडिका, सलाम रंजन सिंग, संदेश झिंगन, आदिल खान, अन्वर अली, सार्थक गोलुई, नरेंदर, सुभाशिष बोस, मध्यरक्षक ः उदांता सिंग, जाकिचंद सिंग, निखिल पुजारी, अनिरुद्ध थापा, रेयनियर फर्नांडिस, प्रणॉय हल्दर, रॉवलिन बोर्जिस, विनित राय, साहल अब्दुल, अमरजित सिंग, ब्रेंडन फर्नांडिस, लालियानझुआला छांगटे, मंदारराव देसाई, आशिक कुरुनियान व मायकल सुसाईराज.
आघाडीपटू ः सुनील छेत्री, बलवंत सिंग, जॉबी जस्टिन, फारुख चौधरी, मनवीर सिंग.