मंत्री पाऊसकर खंडणीप्रकरणी पाचव्या संशयितास अटक

0
152

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकी प्रकरणी पाचव्या संशयिताला पणजी पोलिसांनी काल अटक केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश गडियारी (गुजरात) असे अटक केलेल्या पाचव्या संशयिताचे नाव आहे. मंत्री पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकी प्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

मंत्री पाऊसकर यांच्याकडे ३ कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मंत्री पाऊसकर यांनी खंडणीसाठी फोन करणार्‍या व्यक्तीला रक्कम नेण्यासाठी गोव्यात येण्याची सूचना केली होती. पणजी पोलिसांनी खंडणीची रक्कम नेण्यासाठी आलेल्या तिघांना प्रथम अटक केली होती. या खंडणी प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या खंडणी प्रकरणी पाच जणांना अटक केली तरी खंडणी प्रकरणाचे गूढ अद्याप कायम आहे.