मंत्रीमंडळ समितीला महिनाभराची मुदतवाढ

0
110

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे ह्या समितीचा कार्यकाळ ३१ मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचा आदेश काल गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी काढला.

यापूर्वी एकदा या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. काल दुसर्‍यांदा मुदतवाढीचा आदेश काढण्यात आला असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. तीन सदस्यीय मंत्रीमंडळ समितीचा कार्यकाळ काल ३० रोजी संपला. त्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी या मंत्रिमंडळ समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा व नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय सल्लागार समिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेत उपचारासाठी जाण्यापूर्वी स्थापन केली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मे मि