भोबे असोसिएट केवळ सल्लागार : सुदिन

0
72

एस.एन.भोबे असोसिएट कंपनी ही गोव्यातील विविध प्रकल्पांसाठी केवळ सल्लागार आहे, प्रकल्पाचा आराखडा ती बनवत नाही, असे साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. आराखडा अभियंतेच तयार करतात असे त्यांनी सांगितले. भोबे असोसिएटना गुजरातेत पुलांच्या सदोष कामासाठी काळ्या यादीत टाकण्याचा गुजरात सरकारचा विचार असल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता त्यांनी त्या निर्णयाचा गोव्यातील कामांच्या बाबतीत परिणाम होणार नसल्याचे सांगितले. नवा मांडवी पूल, जुवारी पुलासाठी ही कंपनी सल्लागार म्हणून काम करीत आहे.