भारत सेमीफायनलमध्ये

0
127

बांगलादेशचा १३१ धावांनी पराभव करत भारताने अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २६५ धावा फलकावर लगावल्यानंतर भारताने बांगलादेशचा डाव १३४ धावांत गुंडाळून विश्‍वचषकातील आपली स्वप्नवत वाटचाल कायम ठेवली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा सलामीवीर मनोज कालरा ९ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार पृथ्वी शॉने शुभमन गिलच्या साथीने डाव पुढे नेला. पृथ्वी शॉ ४० धावांवर बाद झाला. तर शुभमनने ८६ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. अभिषेक शर्मानेही अर्धशतक ठोकून संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. भारतीय संघ निर्धारित षटके फलंदाजी करू शकला नाही. चार चेंडू शिल्लक असताना भारताचा डाव २६५ धावांवर संपला. बांगलादेशतर्फे काझी ओनिकने ४८ धावांमध्ये तीन तर नईम हसन आणि सैफ हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

यानंतर भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरुवातीपासून बांगलादेशी फलंदाजांना जखडून ठेवतानाच ठराविक अंतराने गडी बाद केले. सलामीवीर पिनाक घोष (४३ धावा) याचा अपवाद वगळता अन्य कोणताही बांगलादेशी फलंदाज छाप पाडू शकला नाही. बांगलादेशचा डाव १३४ धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारतातर्फे वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर अभिषेक शर्मा आणि शिवम मावी या दोघांनी प्रत्येकी बळी घेत त्याला सुरेश साथ दिली. मंगळवार ३० जानेवारी रोजी भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.

धावफलक
भारत ः पृथ्वी शॉ झे. काझी ओनिक ४०, मनजोत कालरा झे. ह्रदोय गो. रोबिउल ९, शुभमन गिल झे. महिदुल गो. नईम हसन ८६, हार्विक देसाई त्रि. गो. नईम हसन ३४, रियान पराग झे. सैफ गो. काझी ओनिक १५, अभिषेक शर्मा झे. महिदुल गो. हसन महमूद ५०, कमलेश नागरकोटी झे. महिदुल गो. काझी ओनिक ५, अनुकूल रॉय धावबाद २, शिवम मावी झे. अमिनूल गो. सैफ हसन ५, शिवा सिंग त्रि. गो. सैफ हसन ३, इशान पोरल नाबाद ०, अवांतर १६, एकूण ४९.२ षटकांत सर्वबाद २६५
गोलंदाजी ः हसन महमूद ८-०-५५-१, रोबिउल हक ५-०-३४-१, काझी ओनिक १०-०-४८-३, अफिफ हुसेन ८-०-४६-०, नईम हसन १०-०-३६-२, सैफ हसन ८.२-०-४१-२
बांगलादेश ः पिनाक घोष झे. पोरल गो. रॉय ४३, मोहम्मद नईम झे. शॉ गो. मावी १२, सैफ हसन झे. अभिषेक गो. नागरकोटी १२, तौहिद हृदोय धावबाद ९, अफिफ हुसेन झे. पराग गो. अभिषेक १८, अमिनूल इस्लाम धावबाद ३, महिदुल अंकोन त्रि. गो. मावी १०, काझी ओनिक त्रि. गो. अभिषेक ०, नईम हसन त्रि. गो. नागरकोटी ११, हसन महमूद झे. अभिषेक गो. नागरकोटी ०, रोबिउल हक नाबाद १४, एकूण ४२.१ षटकांत सर्वबाद १३४
गोलंदाजी ः शिवम मावी ८-२-२७-२, इशान पोरल ५-२-८-०, कमलेश नागरकोटी ७.१-१-१८-३, रियान पराग ५-०-२५-०, शिवा सिंग ७-०-२९-०, अनुकूल रॉय ५-१-१४-१, अभिषेक शर्मा ५-१-११-२