भारत अंतिम फेरीत

0
95

>> मालदिवच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत गोल नोंदविताना भारताचा मनवीर सिंग (जर्सी क्र. ११)

भारताने काल गुरुवारी मालदिवचा ४-० असा पराभव करत साफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) अंडर १८ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताकडून नरेंदर गहलोत (सातवे मिनिट), मनवीर सिंग (७९वे मिनिट) व निनथोईंगानबा मितेई (८१वे मिनिट) यांनी गोल केले.

मालदिवच्या अहनफ रशीद (४५ + १ मिनिट) याने स्वयंगोलाची नोंद केली. रविवारी होणार्‍या अंतिम फेरीत भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असेल. भारताने प्रारंभीपासून आक्रमक खेळ दाखवला इंटरकॉंटिनेंटल कप स्पर्धेत भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळलेला मध्य बचावपटू नरेंदर याने हेडरद्वारे गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. डावीकडून आलेल्या क्रॉसवर गिवसन याने केलेला गोलप्रयत्न मालदिवचा गोलरक्षक हसन अलीफ याने यशस्वी होऊददिला नाही.

अर्ध्या तासाचा खेळ झालेला असताना निनथोई याने शॉर्ट कॉर्नरवर ताबा मिळवत चेंडू जिकसन सिंगकडे क्रॉस दिला. या चेंडूवर जिकसनने केलेला प्रयत्न काही इंचांनी हुकला. दुसर्‍या सत्रात अमन छेत्रीच्या जागा आकाश मिश्रा याने घेतली.
रवीने स्थिरावण्यास काही वेळ घेतल्यानंतर रवीने जिकसनसह काही चांगले प्रयत्न केले. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आले नाही. बदली खेळाडू मनवीर याने संघाचा तिसरा गोल केला. तर निनथोईने भारताच्या विशाल विजयावर शिक्कामोर्तब केले.