भारतीय लष्कराने ११७ दिवसांत उभारला एल्फिन्स्टन रोड पूल

0
117

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एल्फिन्स्टन रेल स्थानकातील अरुंद पदपुलावरील भीषण दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराने ११७ दिवसात परळ ते एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड व आंबिवली स्थानकावरील पुलाचे काम पूर्ण करण्यात यश मिळवले. या प्रकल्पाचे उद्घाटन काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

गेल्या वर्षी वरील अरुंद पुलावरील चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी या पदपुलांचे काम लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लष्कराने हे काम ११७ दिवसांत पूर्ण केले. जानेवारी २०१८ पर्यंत या कामाच्या पूर्ततेचे लक्ष्य होते. मात्र काही अडचणींमुळे त्यात थोडा उशिर झाला. या पुलांमुळे सुमारे १ लाख ६० हजार प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. या पुलावर १० कोटी ४४ लाख रुपये खर्च झाला आहे. पुलाची लांबी ७३ मीटर व रुंदी ३.६५ मीटर एवढी आहे.