भारतीय महिला उपांत्य फेरीत

0
130

>> कझाकस्तानवर ७-१ अशी मात

ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने नोंदविलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर भारतीय महिलांनी आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिलांनी कझाकस्तानचा ७-१ असा फडशा पाडला.

सामन्याच्या दुसर्‍याच मिनिटाला वीरा दोमाशनेवाने आकर्षक मैदानी गोल नोंदवित कझाकस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु त्यांचा आनंद काही क्षणांपुरतीच टिकाला. कारण गुरजीत कौरने लगेच चौथ्या मिनिटाला गोल नोंदवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारतीय महिलांनी खेळावर पकड मिळविताना कझाकस्तानवर आणखी तब्बल ६ गोल नोंदविले. दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये दीप ग्रेस एक्काने १६व्या मिनिटाला भारताला २ -१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नवनीत कौरने नवनीत कौरने (२२वे व २७ वे मिनिट) भारताची आघाडी ४ -१ अशी मजबूत केली. तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये दीप ग्रेस एक्काने ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर गोल नोंदवित आघाडी ५-१ अशी केली. त्यानंतर गुरजीतने ४२व्या आणि ५६व्या मिनिटाला गोल नोंदवित आपली हॅट्‌ट्रिक साधतानाच भारताला ७-१ अशा विजयासह महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.