भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियावर विजय

0
63
Saina Nehwal of India reacts after winning the match aganist Lindaweni Fanetri of Indonesia during their Uber Cup badminton quarter-final match at Siri Fort Stadium in New Delhi on May 22, 2014. AFP PHOTO/ SAJJAD HUSSAIN (Photo credit should read SAJJAD HUSSAIN/AFP/Getty Images)

>> उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा

भारताची फुलराणी सायना नेहवालच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय महिला बॅडमिंटन संघाने उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतील गट अ मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघावर ४-१ अशी मात केली आहे. भारतीय महिलांना आपल्या सलमीच्या लढतीत कॅनडाकडून १-४ अशा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु त्यानंतर दमदार उभारी मारताना भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियावर मात केली.

पहिल्या सामन्यात सायनाने दमदार खेळी करताना प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन खेळाडू हसुआन-यु वेन्डी चेनचा २१-१४, २१-१९ असा पराभव करीत संघाला १-० अशी अघाडी मिळवून दिली. मात्र दुहेरीच्या सामन्यात मेघना-पुर्वीशा राम जोडीला ऑस्ट्रेलियाच्या ग्रॉयना समरविले व रेणुगा वीरन यांच्याकडून १३-२१, १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारतीय महिलांनी दमदार पुनरागमन करतान उर्वरित तीन लढतींमध्ये बाजी मारली. वैष्णवी रेड्डीने प्रतिस्पर्धी खेळाडू जेनिफर टॅमवर २१-१७, २१-१३ अशी मात केली. तर परतीच्या दुहेरी सामन्यात संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत जोडीने २१-१९, २१-११ असा विजय मिळवत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शेवटच्या सामन्यात १९ वर्षीय गोमंतकीय खेळाडू अनुरा प्रभुदेसाईने प्रतिस्पर्धी खेळाडू झेसिली फंगवर १८ मिनिटांत २१-६, २१-७ अशी मात करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय महिलांचा पुढील सामना जपानविरुद्ध रंगणार आहे.