भारतीय बाजारपेठांत चांदीचे स्थान

0
163

– शशांक मो. गुळगुळे

चांदी हा एक धातू असला तरी या धातूला आपल्या व्यवहारात, जीवनचर्येत विशिष्ट स्थान आहे. हिंदुधर्मियांना धार्मिक विधी करतानाही चांदीची भांडी लागतात. सौभाग्यवतींना एकमेकींना हळदकुंकू लावतानाही चांदीचाच करंडा लागतो. ‘ज्यांच्याकडे चांदी जास्त तो श्रीमंत’ असे ब्रिटिश लोकांचे मत आहे. इंग्लिश भाषेत तशी एक म्हणही आहे- ‘इेीप ुळींह ीळर्श्रींशी ीिेेप ळप र्ोीींह.’ एखाद्या माणसाने फार श्रीमंत घरात जन्म घेतल्यास त्याच्याबद्दल ही म्हण वापरली जाते.२०१३ या वर्षी चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. या वर्षी आपल्या देशाने ५ हजार टन चांदी आयात केली. २०१२ च्या तुलनेत या आयातीत ३५ टक्के वाढ झाली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याचा विचार करता भारत सरकारला चांदी व सोने यांची जास्त आयात होऊ नये असे वाटते. जर ही आयात जास्त झाली तर भारताच्या ‘बॅलन्स ऑफ पेमेन्ट’वर परिणाम होतो. आपण चांदीची जी आयात केली ती प्रामुख्याने लगडी या स्वरूपात केली आहे. या लगड्यांचे आपण चांदीच्या वस्तूंत रूपांतर करून २०१३ या वर्षी १,४८५ दशलक्ष यू.एस. डॉलर्स इतक्या रकमेची निर्यात केली. २०१२ या वर्षी ८०४ दशलक्ष यू.एस. डॉलर्स इतक्या रकमेच्या चांदीच्या वस्तूंची आपण निर्यात केली होती. २०१२ या वर्षाच्या तुलनेत २०१३ या वर्षी निर्यातीत ४५ टक्के वाढ झाली.
देशांतर्गत चांदीची मागणी भागविण्यासाठी आपल्या देशात गरजेइतकी चांदी मिळत नसल्यामुळे आपल्याला निर्यात ही करावीच लागते. भांडी किंवा दागिने उत्पादित करण्यासाठी चांदी लागतेच, तसेच औद्योगिक क्षेत्रालाही चांदी लागते. त्यामुळे आपण सोन्याहूनही चांदीची जास्त आयात करतो. जशी सोन्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आहेत, तसेच चांदीत गुंतवणूक करणारेही गुंतवणूकदार आहेत. गुंतवणूकदारांना चांदीच्या लगडी किंवा नाणी या स्वरूपातील चांदी गुंतवणुकीसाठी लागते. काही महिन्यांपूर्वी जेव्हा रुपयाचे अवमूल्यन होत होते तेव्हा आयातीवर जास्त खर्च होत होता. पण तुलनात्मकदृष्ट्या सोन्याच्या आयातीपेक्षा चांदीच्या आयातीवर कमी खर्च होत होता. त्यामुळे त्या काळात गुंतवणूकदार चांदीत गुंतवणूक करायला प्राधान्य देत होते.
२०१३ च्या पहिल्या तिमाहीत चांदीच्या मागणीत घट झाली होती, कारण त्या काळात चांदीच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या. एप्रिल २०१३ मध्ये चांदीच्या किमती कमी झाल्यावर गुंतवणूकदार परत यात गुंतवणुकीकडे वळले. या काळात चांदीचा किलोचा भाव सुमारे ४० हजार रुपये होता. २०११ या वर्षी चांदीचा भाव सर्वाधिक म्हणजे ७५ हजार रुपये किलो इतका होता. या तुलनेत एप्रिल २०१३ च्या भावात ४७ टक्के घट झाली.
२०१३ साली आपण यू.के.कडून फार मोठ्या प्रमाणावर चांदी आयात केली. यू.के.कडून आपण १,९०० टन चांदी आयात केली. चीन व हॉंगकॉंग या दोन देशांकडून मिळून एकत्रित १,२०० टन चांदी आयात केली. रशिया, स्वित्झर्लंड व तैवान यांच्याकडूनही चांदी आयात केली. स्क्रॅप व रिसायकल्ड चांदीची बाजारपेठ पूर्वी मुंबई व अहमदाबाद येथे होती, आता ही बाजारपेठ इतरत्रही पसरलेली आहे. २०१३ साली सुमारे १,३०० टन स्क्रॅप चांदी बाजारपेठांत उपलब्ध होती.
‘हिंदुस्थान झिंक लिमिटेड’ ही कंपनी भारतात सर्वाधिक चांदी उत्पादित करते. चांदी उत्पादित करण्यासाठी झिंक व शिसे ही बायप्रॉडक्ट वापरली जातात. २०१३ साली या कंपनीने ४०८ टन चांदी उत्पादित केली. गेली दोन वर्षे चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढलेली आहे. २०१२ या वर्षी ८०० टन चांदीच्या दागिन्यांची निर्यात झाली, तर २०१३ या वर्षी १,५०० टनाहून जास्त चांदीच्या दागिन्यांची निर्यात झाली. २००९ पासून सातत्याने भारत सोन्याच्या दागिन्यांपेक्षा चांदीच्या दागिन्यांची फार मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत आहे. २०१० ते २०१३ मध्ये सोन्याच्या दागिन्यांची निर्यात फार कमी झाली होती. २०१२ व १३ मध्ये चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातीत निर्यातमूल्याचा विचार करता ४५ टक्के वाढ झाली होती, तर सोन्याच्या निर्यातीत ७० टक्के घसरण झाली होती.
चांदीची भांडी
धार्मिक व सामाजिक कारणांसाठी भारतात चांदीची भांडी खरेदी केली जातात. तसेच सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी ती भेट म्हणून दिली जातात. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चांदी लागते व भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला प्राधान्य दिले असल्यामुळे भविष्यात या उद्योगाची वाढ अपेक्षित आहे. तसेच या उद्योगाला चांदीची गरजही फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. एलसीडी/एलईडी दूरदर्शन संच उत्पादित करण्याच्या प्रक्रियेत चांदीचा वापर होतो. संगणक हार्डवेअर उत्पादित करताना चांदी हा धातू लागतो. कम्युनिकेशन व ब्रॉडकास्टिंग उपकरणे उत्पादित करतानादेखील चांदी हा धातू लागतो. वाहन उद्योगातही चांदीचा वापर होतो. सौरऊर्जा निर्मितीसाठीही चांदी लागते.
भारतीयांना चांदी हा धातू गुंतवणुकीस प्राधान्य देण्यासाठी फार आवडतो. २०१३ मध्ये २,३०० टन चांदीस गुंतवणुकीसाठी मागणी होती. २०१२ च्या तुलनेत यात १५ टक्के वाढ झाली होती. २०१२ मध्ये याचे प्रमाण २,००० टन इतके होते. २००९ च्या तुलनेत गुंतवणूकदारांच्या मागणीत चार पट वाढ झाली. भारतातील चांदीच्या मागणीची टनांत आकडेवारी दाखविणारा तक्ता-