भारतातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४०% घट

0
139

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४० टक्के एवढी घट झाली असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या दि. १५ ते ३१ मार्च या दरम्यानच्या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आतापर्यंत आढळलेले रुग्ण यांच्या तुलनेत चालू एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

दरम्यान, देशात लॉकडाऊन जारी झाल्यास काल २४ दिवस पूर्ण झाले असताना देशातील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या काल ४५२ एवढी झाली. तर कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या १४ हजारच्या जवळपास नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांच्या माहितीनुसार काल २४ तासातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २३ एवढी होती.

देशातील एकूण कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक ३००० रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याचे नोंद झाली आहे.