भारताचा सहा गड्यांनी विजय

0
109

>> शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची भेदक गोलंदाजी

शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरच्या भेदक गोलंदाजीनंतर मनीष पांडे व दिनेश कार्तिकच्या सहजसुंदर फलंदाजीवर आरुढ होत टीम इंडियाने काल निदाहास टी-२० तिरंगी मालिकेतील सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले १५३ धावांचे लक्ष्य भारताने १७.३ षटकांत गाठले. पांडे व कार्तिक यांनी पाचव्या गड्यासाठी ६८ धावांची अविभक्त भागीदारी रचली.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने संघात एक बदल करत ऋषभ पंतच्या जागी लोकेश राहुलला संधी दिली. तर लंकेने निलंबित कर्णधार दिनेश चंदीमलच्या जागी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलला अंतिम ११ मध्ये स्थान दिले. श्रीलंकेचा संघ एकवेळ ३ बाद ११३ अशा भक्कम स्थितीत होता. परंतु, शेवटच्या सहा षटकांत त्यांनी ५ गडी गमावले. निर्धारित १९ षटकांत त्यांना ९ बाद १५२ धावांपर्यंतच पोहोचता आले. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने किफायतशीर मारा करत केवळ २१ धावांत २ फलंदाजांना माघारी धाडले. पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात झाली. त्यामुळे प्रत्येकी १९ षटकांचा सामना झाला. मालिकेतील पुढील सामना भारत व बांगलादेश यांच्यात १४ रोजी होणार आहे.

धावफलक
श्रीलंका ः दनुष्का गुणथिलका झे. रैना गो. ठाकूर १७, कुशल मेंडीस झे. शर्मा गो. चहल ५५, कुशल परेरा त्रि. गो. सुंदर ३, उपुल थरंगा त्रि. गो. शंकर २२, थिसारा परेरा झे. चहल गो. ठाकूर १५, जीवन मेंडीस त्रि. गो. सुंदर १, दासुन शनका झे. कार्तिक गो. ठाकूर १९, अकिला धनंजया झे. राहुल गो. उनाडकट ५, सुरंगा लकमल नाबाद ५, दुष्मंथ चमीरा झे. उनाडकट गो. ठाकूर ०, नुवान प्रदीप नाबाद ०, अवांतर १०, एकूण १९ षटकांत ९ बाद १५२
गोलंदाजी ः जयदेव उनाडकट ३-०-३३-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२१-२, शार्दुल ठाकूर ४-०-२७-४, युजवेंद्र चहल ४-०-३४-१, विजय शंकर ३-०-३०-१, सुरेश रैना १-०-६-०
भारत ः रोहित शर्मा झे. मेंडीस गो. धनंजया ११, शिखर धवन झे. परेरा गो. धनंजया ८, लोकेश राहुल स्वयंचित गो. मेंडीस १८, सुरेश रैना झे. परेरा गो. प्रदीप २७, मनीष पांडे नाबाद ४२, दिनेश कार्तिक नाबाद ३९, अवांतर ८, एकूण १७.३ षटकांत ४ बाद १५३
गोलंदाजी ः सुरंगा लकमल २-०-१९-०, अकिला धनंजया ४-०-१९-२, दुष्मंथ चमीरा ३-०-३३-०, नुवान प्रदीप २.३-०-३०-१, जीवन मेंडीस ४-०-३४-१, थिसारा परेरा २-०-१७-०