भारताचा विंडीजवर ५९ धावांनी विजय

0
112

कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि स्विंग गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारने घेतलेल्या चार बळींच्या बळावर भारताने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ५९ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७९ धावा केल्या होत्या. मात्र विंडीजचा डाव सुरू असताना पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर विजयासाठी ४६ षटकात २७० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. पण विंडीजचा संघ २१० धावांपर्यंत मजल मारु शकला.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेल व लुईस या विंडीजच्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. या द्वयीने पहिल्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी झाल्यानंतर भुवनेश्‍वरने ख्रिस गेलला माघारी धाडले. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज शेय होप, शिमरॉन हेटमायरही झटपट माघारी परतले. निकोलस पूरन आणि लुईस यांनी चौथ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. अखेरीस कुलदीपने एविन लुईसला माघारी धाडत विंडीजची जमलेली जोडी फोडली. त्याने आपले सहावे वनडे अर्धशतक लगावताना ६५ धावा केल्या. यात ८ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. भुवनेश्वर कुमारच्या चार बळींव्यतिरिक्त कुलदीप यादव व मोहम्मद शमीने प्रत्येकी २ तर खलील अहमद आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ बळी घेतला.

धावफलक
भारत ः ७ बाद २७९
वेस्ट इंडीज ः (लक्ष्य ४६ षटकांत २७०) ः ख्रिस गेल पायचीत गो. भुवनेश्‍वर ११, इविन लुईस झे. कोहली गो. कुलदीप ६५, शेय होप त्रि. गो. खलील ५, शिमरॉन हेटमायर झे. कोहली गो. कुलदीप १८, निकोलस पूरन झे. कोहली गो. भुवनेश्‍वर ४२, रॉस्टन चेज झे. व गो. भुवनेश्‍वर १८, जेसन होल्डर नाबाद १३, कार्लोस ब्रेथवेट झे. शमी गो. जडेजा ०, किमार रोच त्रि. गो. भुवनेश्‍वर ०, शेल्डन कॉटरेल झे. जडेजा गो. शमी १७, ओशेन थॉमस