भाज्यांचे दर कडाडले

0
126

>> सर्वच भाज्या ५०रु. किलोच्या पुढे

सध्या गोव्यात भाज्यांचे दर गगनाला भिडले असून लोकांवर एक वेळ मासळी परवडली पण भाज्या नकोत असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या बाजारात कोणतीच भाजी ५० रु. प्रती किलोपेक्षा कमी दरात उपलब्ध नसून गाजर व बीटचे दर प्रती किलो ८० रु. असे भडकले आहेत. सर्वांत स्वस्त समजल्या जाणार्‍या कोबीचे दरही प्रती किलो ५० ते ६० रु. असे वाढले आहेत. टॉमेटो ४० ते ५० रु. प्रती किलो असून कांद्याने अर्धशतक गाठलेले आहे. वालपापडी ८० रु. प्रती किलो एवढी महाग झालेली असून गावठी भाज्यांचे दरही नियंत्रणाबाहेर गेले आहेत.
गोव्यात पिकणारी तांबडी भाजी कधी नव्हे एवढी महाग झालेली असून ३ छोट्या जुड्या ५० रु.ला विकल्या जात आहेत. तर मुळ्याची भाजी त्याहीपेक्षा महाग झालेली असून ५० रु.ला ५ मुळे अशा दरात ही भाजी विकली जात आहे. त्यातल्या त्यात बटाटा जरा स्वस्त असून तो ४० रु. प्रती किलो उपलब्ध आहे.
मासळीपाठोपाठ भाज्यांचे दर अशा प्रकारे गगनाला भिडल्याने गोमंतकीय हवालदील झाले आहेत.