भाजप-शिवसेना पुनर्मिलनासाठी संघाकडून भाजप नेत्यांना सूचना

0
90

महाराष्ट्रात सत्तेतील वाट्यावरून भाजप-शिवसेना यांच्यातील राजकीय घटस्फोटानंतर आता या पक्षांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याऐवजी शिवसेनेशी पुन्हा युतीसाठी प्रयत्न करण्याविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेत्यांना सूचना केल्याचे या सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्ष भाजपातही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून नाराजी असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे. भविष्यात यामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप-शिवसेना यांच्यात पुन्हा युतीचे प्रयत्न करण्याचे संकेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याचे वृत्त आहे.