भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध पणजी पोलिसात तक्रार

0
87

>> गिरीश चोडणकरांना धमकीचा आरोप

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याविरोधात पणजी पोलिसात काल तक्रार दाखल केली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या पणजी गट समितीचे अध्यक्ष प्रसाद आमोणकर यांनी ही तक्रार दाखल केली. भाजपने गेल्या २६ जून रोजी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना तेंडुलकर यांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष चोडणकर यांना धमकी दिली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. दिवंगत खासदार शांताराम नाईक यांना दिलेल्या प्रसादाप्रमाणे गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांना प्रसाद देण्यात येईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी केले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कसून चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी तक्रारीत करण्यात आली आहे.