भाजपला कंपन्यांकडून मिळाले ७०५ कोटी

0
112

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने काल जाहीर केलेल्या एका अहवालानुसार २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत देशातील विविध २९८७ उद्योगसमूह तथा कंपन्यांनी देशातील राजकीय पक्षांना एकूण ९५६.७७ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७०५.८१ कोटी रुपये (८९ टक्के) एवढी रक्कम भारतीय जनता पक्षाला देणगी रूपात मिळाली आहे.
कंपन्यांकडून देणग्या मिळवण्याबाबत भाजपनंतर दुसर्‍या क्रमांकावर कॉंग्रेस पक्ष आहे. कॉंग्रेसला १९८.१६ कोटी रुपये मिळाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरील संस्थेने अहवाल तयार केला आहे. त्यानंतर कंपन्यांकडून देणग्या मिळालेले राजकीय पक्ष व रक्कम यांचा तपशील पुढीलप्रमाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस ५०.७३ कोटी, माकप (मार्क्सवादी) १.८९ कोटी, भाकप- ०.१८ कोटी. वरील कालावधीत आपल्याला २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली नाही असे बहुजन समाज पक्षाने जाहीर केल्याने त्यांचा विचार अहवालात झाला नाही.